भारतीय राज्यघटनेच्या उदारमतवादी (liberal character) रूपाची प्रचिती
विभाग ३ मधील मूलभूत आधिकारांच्या तरतुदीवरून येते. या आधिकारांमध्ये
सामान्य मानवी आधिकारांचा समावेश आहे जसे - कायद्यासमोर नागरिकांची समानता
किंवा धर्म, वंश, जात, लिंग वा प्रांत आदी मुद्द्यांधारे न केला जाणारा
भेदभाव (कलमे १२ -१८) दलितांवरच्या अत्याचाराविरूद्धचे कलम १७ विशेष
महत्त्वाचे आहे. अस्पृश्यता पाळणे हा या कलमाने दंडनीय गुन्हा आहे. घटनेत पाच मूलभूत प्रकारचे आधिकार ओळखण्यात आले आहेत.
- स्वातंत्र्य (कलम १९-२२): भाषणस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य सभा वा संघटना स्थापण्याचे स्वातंत्र्य, पेशा निवडण्याचे स्वातंत्र्य (कलम १९)
- शोषणाविरूद्ध संरक्षण (कलम २३ व २४): बालमजूरी व मानवी तस्करी (human trafficking) पासून संरक्षण
- धर्मस्वातंत्र्य (कलम २५-२८) : पूजा व आचरणाचे स्वातंत्र्य
- अल्पसंख्याकांचे आधिकार (कलम २९ व ३०): अल्पसंख्याकांना संरक्षण व स्वतःच्या शिक्षणसंस्था स्थापण्याचे स्वातंत्र्य
- घटनात्मक तक्रारींचा आधिकार (कलम ३२-३५): मूलभूत आधिकारांचे हनन झाले आहे असे वाटल्यास कोणत्याही व्यक्तीस कलम ३२ अन्वये सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा हक्क आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा