भारताचे राष्ट्रपती

भारताचा राष्ट्रपती हा भारत देशाचा राष्ट्रप्रमुख आहे. राष्ट्रपती हा सरकारचा, संसदेचा व न्यायसंस्थेचा कायदेशीर प्रमुख असून तो भारतीय सेनेचा लष्करप्रमुख देखील आहे.
भारताच्या संविधानानुसार राष्ट्रपतीची निवड थेट नागरिकांद्वारे न होता संसदेच्या लोकसभाराज्यसभा ह्या शाखांमधील निर्वाचित प्रतिनिधींमार्फत होते. राष्ट्रपतीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. नवी दिल्लीमधील राष्ट्रपती भवन हे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: